Latest News

कळमगाव येथील मालीनी वाघ यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी करा – तंटामुक्त समिती व गावकऱ्यांचे पोलीस अधिक्षक, ठाणेदारांना निवेदन



अन्यथा उपोषणास बसण्याचा दिला इशारा

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

तालुक्यातील कळमगाव येथील राहिवासी सौ. मालीनी वाघ व त्यांचे पती विनोदराव वाघ हे शुल्लक कारणावरून गावांत जाणीवपुर्वक भांडणतंटे करीत असुन गावातील राहिवासी असलेल्या अनिस पाटेकर व सुरेश वाघ यांच्याविरूध्द स्थानिक पोलीस स्टेशनला खोटी तक्रार दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असुन या तक्रारीची तत्काळ चौकशी करण्याची मागणी पोलीस अधिक्षक अमरावती व ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
         चांदुर रेल्वे पासुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम कळमगाव येथील सौ. मालीनी वाघ व त्यांचे पती विनोदराव वाघ हे घराजवळून जाणाऱ्या- येणाऱ्या अनेक लोकांसोबत जाणीवपुर्वक भांडणतंटे निर्मान करीत असुन खोट्या विनयभंगाची तक्रार सुध्दा स्थानिक पोलीस स्टेशनला दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील अनिस पाटेकर याच्याविरूध्द विनयभंगाची व सुरेश वाघ यांच्या दुसरी खोटी तक्रार करण्यात आली आहे. तक्रारकर्त्या मालीनी वाघ ह्या भाजपाच्या महिला अध्यक्ष असुन “राज्यात आमचेच सरकार आहे, पोलीस आमचे काहीच करू शकत नाही” असे अनेकवेळा म्हटल्याचा आरोपसुध्दा गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातुन केला आहे. तसेच ह्या गावामध्ये जातीय तेढ निर्मान करण्याचा प्रयत्न सुध्दा करीत असून गावकऱ्यांची या कुटुंबाविषयी मानसिकता पुर्णपणे कटु झालेली आहे. त्यामुळे त्वरीत या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्यात यावा अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा कळमगाव तंटामुक्ती अध्यक्ष सागर दुर्योधन, सचिव देवदत्त मेश्राम, सौ. प्रमिला वाघ, अलका वाघ, अंजली वाघ, वंदना वाघ, मिना वाघ, रेखा वाघ, माया वाघ, स्वाती वाघ, गौरी देशमुख, लता जगताप, सुनंदा वाघ, प्रिया कडु, इंदिरा वाघ, अर्चना सराड, जया जोशी, वैशाली कदम, संजय देशमुख, प्रकाश वाघ, शालु खोडे, आशा खोडे, कमु पोहेकर, जयश्री कदम, दुर्गा कदम, कुसुम काळमेघ, उषा शेळके, विद्या शेळके, ज्योती काळमेघ, दिपाली काळमेघ, रंजना मेश्राम, अनिता गजभिये आदींसह अनेक गावकऱ्यांनी पोलीस अधिक्षक व ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे..

via Blogger http://ift.tt/2j3Z5fR




from WordPress http://ift.tt/2j8ywKv
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.