राज्यमंत्री सहकार तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील हे परभणी जिल्हयाच्या दौरावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी सकाळी 7.00 वाजता परभणी रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 7.20 वाजता परभणी रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने कृषी विद्यापीठातील विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.40 वाजता कृषी विद्यापीठ विश्रामगृह येथे आगमन. 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 12.00 वाजता परभणी येथे व्यायामशाळेचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी. दुपारी 3.00 वाजता जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती,परभणीची आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक. सायंकाळी 4.30 वाजता परभणी जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक. व सोईनुसार शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
via Blogger http://ift.tt/2j8GkvY
from WordPress http://ift.tt/2ia1JR6
via IFTTT
No comments:
Post a Comment