परभणी : /-
जिल्ह्यामध्ये रब्बीचा हंगाम चालू असुन शेतकर्यांना विजेची नित्तांत आवश्यकता आहे. बर्याच ठिकाणी ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर महावितरणकडून लवकरात लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांमधुन येत आहेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरूस्ती करून घ्यावेत अशा सुचना खा. संजय जाधव यांनी दिल्या.
जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापौर संगीता वडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल खोडवेकर, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड व जिल्ह्यातील संबंधीत विभागातील अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जाधव म्हणाले की, सध्या रब्बी पिकांसाठी पाणी देण्याचे काम चालु आहे. कमी व अधिक दाबामुळे विज ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात जळत आहेत. जिल्ह्यात एकाच ठिकाणी दुरूस्तीचे काम होत असल्यामुळे शेतकर्यांना तात्काळ हे ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्रामध्ये दुरूस्तीची कामे करून घेण्यासाठी कार्यवाही महावितरण कंपनीने करावी, असे सांगितले व केंद्र पुरस्कृत राबविण्यात येणार्या विविध २८ योजनांतर्गत आढावा घेण्यात आला. तसेच सर्व योजनांमध्ये उद्दिष्टे मार्च २०१७ पुर्वी पूर्ण होतील याबाबत दक्षता घेवून कार्यक्षमरित्या व पारदर्शी राबवाव्यात. स्वयंसहाय्यता गटांना कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट फेब्रुवारी २०१७ पुर्वी कराव्यात अशा सुचनाही यावेळी करण्यात आल्या.
via Blogger http://ift.tt/2hP6YJS
from WordPress http://ift.tt/2j6xi2q
via IFTTT
No comments:
Post a Comment