चांदुर येथील सी सी एन न्युज चॅनल चे संचालक तथा अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल विष्णूआप्पा गवळी (वय 42) शनिवारी सकाळी कार्यालया मध्ये कामकाज करत असताना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या 10 ते 12 लोकांनी अमोल गवळी यांच्यावर लोखंडी पाईप,काचेचे बॉटल,व फायटर ने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी अटकेतील ५ आरोपींना अमरावती येथील न्यायालयात रविवारी हजर केले असता त्यांना १ दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की चांदुर रेल्वे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष तथा स्थानिक सी सी एन न्युज चॅनल चे संचालक अमोल गवळी नेहमी प्रमाणे शनिवारी (ता,31)सकाळी कार्यालयात बसले असतांना आशिष वानखडे, गाढवे यांच्या समवेत 10 ते 15 गुंड प्रवृतीच्या लोकांनी कार्यालयात घुसून त्यांच्या वर हल्ला चढविला व त्यांना कार्यालयाच्या बाहेर ओढून फायटर ,लोखंडी पाईप काचेच्या बॉटल जोरदार मारहाण करने सुरु केले. त्याच वेळीं अंकुश खाडे व सागर गावंडे या दोघांवरही हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोर हे क्वालिस गाडी (एमएच ३१/एएच०६३४)मधून व मोटार सायकल वर आले होते.अमोल गवळी यांना मारहाण होताना दिसताच धावून आलेल्या नागरिकांनी हल्ले खोरांना परतावून लावले, नागरिकांची गर्दी वाढतच हल्ले खोरांनी आपला घटना स्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात अमोल गवळी यांच्या पाठीला, मानेला, व पायांना जबर दुखापत झाली. या प्रकरणी आरोपी आशीष प्रकाश वानखड़े रा. आमला, किशोर गोविन्द राठोड, अर्जुन रतंसिंग चौहान, दिनेश शालिकराम राठोड, प्रियत मधुकर भटकर
सर्व रा.अमरावती यांना अटक करून रविवारी त्यांना अमरावती येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १ दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे. कारण या हल्ल्यात एकुन १०-१२ हल्लेखोरांसह २-३ दुचाकी वाहनांचा समावेश असल्याचे जखमींनी सांगितले. त्यामुळे उर्वरीत आरोपींच्या अटकेसाठी पीसीआर देण्यात आल्याचे समजते.
via Blogger http://ift.tt/2iDIboR
from WordPress http://ift.tt/2iDK05u
via IFTTT
No comments:
Post a Comment