तालुक्यात दुधना नदी पात्रातुन अवैध पद्धतीने वाळु उपसा होत असल्याची माहिती नायब तहसीलदार निलेश पळसकर यांना मिळाल्या नंतर त्यांनी दुधना नदी पात्रातील काजळी रोहिणा शिवारात जावुन अवैध पद्धतीने वाळु भरतांना दोन ट्रक्टर पकडली.
रविवार 1जानेवारी रोजी दुधना नदी पात्रातुन अवैध पद्धतीने वाळुचा उपसा करणारी दोन ट्रक्टर नायब तहसीलदार यांनी पकडली. काजळी रोहिणा शिवारात दुधना नदी पात्रातुन अवैध पद्धतीने वाळु चे उदखन्न करत असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी जावुन नायब तहसीलदार यांनी दोन ट्रक्टर पकडली. यामध्ये एम. एच. 29 डी. 5591 व एम. एच. 44 डी. 305 या दोन वाहनांना दुधना नदी पात्रात अवैध वाळु उपसा करतांना पकडले. या ट्रैक्टर चा ताबा पोलिस स्टेशनला देण्यात आला. या कार्यवाहीमुळे तालुक्यात होत असलेली अवैध पद्धतीने वाऴुची तस्करीस लगाम बसणार आहे.
◆अवैध वाळु उपसा रोखणार.
तालुक्यात दुधना नदी पात्रातुन मोठ्या प्रमाणावर अवैध वाळुचा उपसा होत आहे. अवैध वाळुची वाहतुक करणारे ही वाहने व वाहनधारक ही लोकांना त्रास देत आहेत.या अवैध पद्धतीने वाळु उपसा करणा-यांची गय करणार नसल्याची प्रतिक्रिया नायब तहसीलदार निलेश पळसकर यांनी दिली.
via Blogger http://ift.tt/2iFsM7P
from WordPress http://ift.tt/2iWIgHU
via IFTTT
No comments:
Post a Comment