परिनिरीक्षण मंडळाची अनुमती मिळाल्यानंतर नाटकाला विरोध करणे हे अयोग्य आहे. मागील शासनाने मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकावर बंदी घातली होती. त्यानंतर न्यायालयाची मान्यता मिळून या नाटकाचे प्रयोग पुन्हा चालू झाले. असे असतांना काही जणांकडून सदर नाटक बंद करण्याची मागणी केली जात आहे. ज्यांना नाटकातील सूत्रे पटत नसतील, त्यांनी नाटक बघू नये. नाटकाला विरोध करणारे हे लोक चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि न्यायालयाच्या वर आहेत का ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केला. टी.व्ही. ९ या वृत्तवाहिनीवरील बोल महाराष्ट्रा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या गोडसेंच्या विचारधारेचं उदात्तीकरण होतंय का ? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अभिनेता श्री. शरद पोंक्षे यांच्या हे राम नथुराम या नवीन नाटकाला होणार्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात भाजपचे प्रवक्ता राम कदम, अभिनेता श्री. शरद पोंक्षे, काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे, तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानूसे हे सहभागी झाले होते.
via Blogger http://ift.tt/2iFXccZ
from WordPress http://ift.tt/2j6nZzA
via IFTTT
No comments:
Post a Comment