पिंपरी–
पुणे शहरातील संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने ३ जानेवारी या दिवशी उखडून नदीपात्रामध्ये फेकून दिला. त्याचा निषेध करण्यासाठी आज ४ जानेवारी या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. या वेळी ‘राम गणेश गडकरी यांचा हा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. असे दुष्कृत्य करणार्या संभाजी ब्रिगेडवर बंदी आणा’, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या वेळी अधिवक्ता मोरेश्वर शेडगे, पिंपरी-चिंचवड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय बुडूख, कार्याध्यक्ष पवन वैद्य, प्रवक्ता अरविंद खुळगे, सचिव मुकुंद कुलकर्णी यांसह अनेक जण आंदोलनाला उपस्थित होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन ‘संभाजी ब्रिगेडचा धिक्कार असो’ यासह अन्य घोषणा दिल्या.
अरविंद खुळगे म्हणाले की, हे कृत्य केवळ ४ जणांचे नाही. त्या मागच्या वाईट लोकांना शोधले पाहिजे. अशांना मुळात ‘राम गणेश गडकरी कोण’, हे कळलेच नाही. त्यांचे हे कृत्य बालीश आहे. त्यांचा पुतळा नाही बसवला तरी चालेल; कारण गडकरींचे स्थान पुतळ्यांनी निश्चित करता येणार नाही.
via Blogger http://ift.tt/2iFGPL2
from WordPress http://ift.tt/2iRnR3H
via IFTTT
No comments:
Post a Comment