Latest News

शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे – फुलचंद कराड  . तळेगाव येथे तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे उद्घाटन

परळी वैजनाथ / मोईन खान /- 

– सततचा दुष्काळ, वाढत चाललेली महागाई लक्षात घेता शेतकर्‍यांनी आता शेतीसोबत इतर व्यवसायाची जोड देणे आवश्यक असून शेतकर्‍यांनी आता दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड  यांनी केले आहे.पारंपारिक शेतीला जोड दिल्याशिवाय आर्थिक उत्पन्नात वाढ होणे शक्य नसल्याने शेतकर्‍यांनी आता नव्या व्यवसायाला आत्मसाद करण्याची गरज असल्याचे ङ्गुलचंद कराड म्हणाले. तुळजाभवानी दुध संकलन केंेद्राचे आयोजक मुरलीधर मुंडे यांच्या संकल्पनेचा आदर्श सर्व तरुणांनी घ्यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे संचालक वसंतराव मुंडे यांनी केले.

तळेगाव ता.परळी वैजनाथ येथे तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे उद्घाटन १ जानेवारी रोजी  फुलचंद कराड  यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्ष वसंतराव मुंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. परळी तालुका दुध संघाने दुध संकलनासाठी संगणक यंत्रणा सुरु केली असून आधुनिक पद्धतीने दुग्ध तपासणी मशीन सुद्धा येथे बसविण्यात आली आहे. आपल्या भाषणात पुढे बोलतांना ङ्गुलचंद कराड म्हणाले की, ऊस व इतर पिके आपण नगदी पिके म्हणून नेहमीच घेत आलो आहोत. परंतु मागील काही वर्षापासून सतत दुष्काळ आल्यामुळे पिके हातून गेली असून कारखानेसुद्धा बंद ठेवायची वेळ अनेक ठिकाणी आली आहे. अशा वेळी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा एक उत्तम पर्याय असून सुशिक्षीत शेतकर्‍यांनी आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी दुधाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरु करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दर दहा दिवसाला दुधाचे पैसे मिळत असल्याने हा नगदी पैसा असून दुग्ध व्यवसायातून शेनखत व अन्य साहित्यही मिळत असल्याने त्याचेही पैसे मिळतात. आता कॅशलेस ही नवी पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली असून दर दहा दिवसाला शेतकर्‍यांच्या खात्यात आपोआप दुधाचे पैसे पडू शकतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, पांगरी कॅम्प येथील आपले दुध केंद्र लवकरच सुरु होणार असल्याचे फुलचंद कराड  म्हणाले. जवाहरलाल नेहरु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे, सरपंच सुर्यभान मुंडे,भागवत मुंडे, माऊली काचगुंडे, प्रशांत कराड, जनार्धन मुंडे, पैहलवान कराड, गोविंद मुंडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  उपसरपंच नारायण मुंडे यांनी केले.

via Blogger http://ift.tt/2hP7ebY




from WordPress http://ift.tt/2j6r8iL
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.