जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ४ महिन्यापूर्वी घडली असून कुमारिकेने आता दिलेल्या तक्रारीवरून ३ आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे .तालुक्यातील आसलगाव येथील आरोपी गणेश उर्फ ज्ञानेश्वर तुकाराम तायडे ,अर्जुन दत्तू तायडे ,अरुण पांडुरंग तायडे , यांनी ४ महिन्यापूर्वी अल्पवयीन कुमारिकेवर अत्याचार केला असल्याची तक्रार आज दिनांक ३० डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनला दिल्यावरून अप नं.५११/१६ कलम ३७६ (ब),(ल ),(आय),(न),३७६ (ड),५०६ व सहकलम ४ ,५, (ग ),(ज ),(२),(ल ),६,बालकाचे लैगिक शोषण विरोधी कायद्यान्वे गुन्हे दाखल करून आरोपी गणेश उर्फ ज्ञानेश्वर तुकाराम तायडे ,अर्जुन दत्तू तायडे ,अरुण पांडुरंग तायडे यांना पोलिसांनी अटक केली असून पोउपनि राठोड , पोउपनि अहिरे मॅडम व सहकारी पो.कॉ. प्रवीण जाधव, राजू टेकाडे हे पुढील तपास करीत आहे
via Blogger http://ift.tt/2ivPfXx
from WordPress http://ift.tt/2iDGiZs
via IFTTT
No comments:
Post a Comment