चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
चांदुर रेल्वे ते मालखेड रेल्वे रा रस्त्यावर स्कुल व्हैन ने मुलांची ने आण करणाऱ्या चालकाने व्हैनमध्येच ९ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजता घडली असुन यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे..
सविस्तरवृत्त असे की, आरोपी नावेद खॉ रहेमत खॉ पठान पठान (वय- ३२) रा. मालखेड हा नेहमीच मालखेडवरून चांदुर रेल्वे येथील शाळकरी मुलांची व्हैनने ने – आण करतो. नेहमीप्रमाणे शनिवारी ११.३० वाजता चांदुर रेल्वे येथुन शाळकरी मुले घरी परत आणत असतांना एका ९ वर्षाच्या लहान चिमुरडीवर समोर बसली असतांना व्हैनमध्येच अत्याचार केला. या झालेल्या घटनेबद्दल चिमुरडीने आपल्या पालकांना सांगितले. या नंतर पालकांसह चिमुरडीने चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन गाठले. घटनेची तक्रार देताच पोलीसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीविरूध्द पास्को ४ कायद्यांतर्गत अैक्ट्रॉसिटी ३(१) १० ३(११), ३७६ (२) भादवी अन्वये गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास पीएसआय नंदा वैश्य करीत आहे. घटनेची माहिती होताच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी गवई यांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला भेट दिली.
via Blogger http://ift.tt/2kgoO9K
from WordPress http://ift.tt/2j0znbW
via IFTTT
No comments:
Post a Comment