सद्यस्थितीत सगळीकडे चर्चेत असलेल्या ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाच्या चांदुर रेल्वे शहरात ऐंट्रीचे संकेत मिळत आहे. राज्यात सगळीकडे पक्ष विस्तार होत असतांना याच हेतुने शहरात सुध्दा एका छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी पक्षाशी जुळण्याची इ़च्छा दर्शविली.
स्थानिक काझीपुरा येथे संपन्न झालेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणुन अमरावती येथील एआयएमआयएमचे अब्दुल नाजीम, सलाऊद्दीन खान, फिरोज खान कुरैशी, शहेजाद खान, मो. इम्रान, इकराम कुरैशी, शाहाजाद खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सगळीकडे अनेक समस्या व प्रश्न आहेत. यासाठी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करणार आहोत. तळागाळातील व मागासवर्गीय लोकांना न्याय देऊन पक्ष विस्ताराचे काम एमआयएम करीत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी उपस्थित शहरवासीयांसोबत प्रमुख पाहुण्यांनी संवाद साधला व शहरात कार्यकारीणी लवकरच गठीत करण्याचे संकेत दिले. या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला असुन इतर पक्षातील अनेकांचा एमआयएममध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
यावेळी बैठकीला अनिस सौदागर, इस्माईल कुरैशी, वाहिद कुरैशी, मो. जफर खान, शकील सौदागर, मो. अकबर खान, आसीफ खान, समीर खान ताबीश कुरैशी, इम्रान सौदागर, सलमान पठाण, हारूण कुरैशी, हरीस सौदागर, वसीम खान, आदील सौदागर यांसह अनेक शहरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2ilStfO
from WordPress http://ift.tt/2hGKOJT
via IFTTT
No comments:
Post a Comment