चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन !
प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना डावीकडून ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, डॉ. हेमंत चाळके आणि श्री. संजय जोशी |
चिपळूण – आपण सर्वजण एका ध्येयाने प्रेरीत आहोत. ही प्रेरणा आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आहे. हिंदूंचा एकमेव असलेला हिंदुस्थान हाच आपला देश आहे. सनातन हिंदु धर्म हा वैदिक हिंदु धर्म आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतु:सूत्रीवर हिंदु धर्म उभा आहे. हिंदु धर्माला संस्थापक नाही. हा एकमेव असा धर्म आहे ज्याला संस्कृतीही आहे. अन्य धर्मांना संस्कृती नाही, ते संस्कृतीहीन आहेत. प्रारंभी आपल्या धर्मातील सर्व संप्रदाय एकत्रित होते. मोगल आणि ब्रिटीश यांनी त्यांच्या नीतीने सर्व संप्रदायांना हिंदु धर्मापासून वेगळे केले. चिपळूण ही हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेची भूमी आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मातील सर्व संप्रदाय एकत्रित यावेत, यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे. आज सर्व संप्रदायांनी एकत्रित येणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु धर्मातील संप्रदायांनी एकत्रितरित्या कार्य केल्याने त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना हे स्वप्न नाही, तर ते एक ध्येय आहे. भारत निधर्मी राष्ट्र न रहाता हिंदुस्थान निर्माण व्हायला हवा असेल, तर सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण आपापसांतील मतभेद, संप्रदाय आणि उपासना वैयक्तिक स्तरावर ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित होऊया, असे आवाहन महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे कोकण प्रांत उपाध्यक्ष ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज २० नोव्हेंबरला बहादूरशेख नाका येथील स्वामी मंगल हॉल मध्ये रत्नागिरी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी खेड तालुका वारकरी भाविक संघटनेचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे, अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव, ह.भ.प. मधुकर चांदे, लांजा येथील ह.भ.प. दादा रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनातील क्षणचित्रे
* ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. ज्ञानदेव पाटील यांनी प्रारंभी शंखनाद केला. सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे त्यांनी वाचन केले.
* श्री संप्रदायाचे प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक जगताप यांनी केले.
* हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी रत्नागिरी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.
via Blogger http://ift.tt/2geVZpw
from WordPress http://ift.tt/2fzC3w3
via IFTTT
No comments:
Post a Comment