डावीकडून श्री. कार्तिक साळुंखे, श्री. अभय वर्तक,
|
नवी देहली – शिवसेनेचे मुंबईतील खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते सनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे त्यांच्या देहली येथील निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांचे स्वीय साहाय्यक आणि मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी श्री. प्रसाद जोशी, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक अणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे उपस्थित होते. श्री. गजानन कीर्तिकर म्हणाले, हा ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि सर्व मनोविकारग्रस्तांनी हा ग्रंथ वाचून उपाय करावेत.
श्री. कीर्तिकर यांनी मनोविकारग्रस्त व्यक्तींवर उपाय व्हावेत अणि त्यांना निरोगी आयुष्य जगता यावे, या संदर्भात संसदेत एक खाजगी विधेयक सादर केले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव ही महत्त्वाची समस्या आहे. भारतात १० ते २० कोटी भारतीय विविध मानसिक आजारांना सामोरे जात असतांना याकडे कमालीचे दुर्लक्ष होते आहे, असे लक्षात आल्याने श्री. कीर्तीकर यांनी हे विधेयक सादर केले आहे.
via Blogger http://ift.tt/2gHIoJG
from WordPress http://ift.tt/2gWVUJS
via IFTTT
No comments:
Post a Comment