Latest News

पूर्णा नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भवितव्य मत पेठीत बंद

                                 🔹सरासरी ७४.२९ टक्के मतदान                             
🔹मतदान शांततेत पार,पोलीसांचा 
🔹चोख बंदोबस्त,
🔹कुठेही अनुचित प्रकार नाही

परभणी / Pathan Azad khan/-

पूर्णा नगरपालिकेची निवडणुक अटीतटीची झाली असुन नगराध्यक्ष पदासह नगररसेवकांच्या २० जागेसाठी शहरातील २८८५७ मतदारा पैकी  २१४५९ मतदारांनी  आपला मतदानचा हक्क ३७ मतदान केंद्रावर बजावला.सकाळी ७.३० वा.प्रत्यक्ष मतदानाला सुरवात होवुन सकाळी ११.३० वा. २९.४०% ,दुपारी  १.३० वा.४१.९८%,३.३० वा.५९.२९ टक्के, ५.३० वा. मतदानाची वेळ संपे पर्यंत  २१४५९ मतदारांची मतदान केले त्यात महिला मतदार १०३६८ तर पुरुष मतदार ११०९१ मतदार आसुन सरासरी मतदान ७४.२९% मतदान झाले.
.नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते .यात राष्ट्रवादी पक्षांच्या शाहिस्ता जाकीर कुरेशी ,काँग्रेसच्या अनिता सुनिल जाधव, शिवसेनेच्या  गंगाबाई सिताराम एकलारे यांच्यात. काट्याची टक्कर असुन उद्या मतमोजनी असुन कोन नगराध्यक्ष पदावर  तर नगरसेवकाच्या २० जागेसाठी १३६ उमेदवारांचे भवितव्य मत पेठीत बंद झाले . असुन कोन बाजी मारतो हे आज मतमोजनी झाल्यावर कळेल.या  मतदानाच्या प्रक्रीयेसाठी प्रशासनाच्यावतीने निवडणुकीत दहा प्रभागासाठी ३७ मतदान केंदात ४० मतदान केंद्राध्याक्ष,मतदान अधिकारी ८ व मोठा पोलिंसाचा कडेकोट बंदोबस्त ठेवाण्यात आला.किरकोळ प्रकार वगळता शहरात सर्वच मतदान केंद्रावार मतदान शांततेत पार पडल असुन मतदान प्रक्रीया यशस्वी  करण्यासाठी तहसीलदार माचेवाड ,मुख्याधिकारी तथा निवडणुक सहाय्यक अधिकारी मंगेश देवरे यांनी परिश्रम घेतले.

via Blogger http://ift.tt/2gMbsA4




from WordPress http://ift.tt/2gvhzod
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.