Latest News

धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

मार्गदर्शन करतांना श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

    




  कोल्हापूर- आज देशात हिंदूंच्या पावणे दोन लक्ष हिंदू मुली बेपत्ता आहेत. देश आणि धर्म धोक्यात आलेला आहे. दिवसभर आई-वडील कामात व्यस्त असल्याने मुलांकडे त्यांचे लक्ष नसते. लव्ह जिहाद हे हिंदूंची शक्ती अल्प करण्याचे षड्यंत्र आहे. एकही हिंदु मुलगी लव्ह जिहादाला बळी पडणार नाही, धर्मांतरण करणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आज हिंदु धर्म, मंदिर आणि हिंदु मुली सुरक्षित नाहीत. हिंदु धर्मात जन्म घेणार आणि हिंदु धर्मातच मरणार, या तत्त्वानुसार प्रत्येक हिंदूने तसे आचरण केले पाहिजे. धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मरक्षणासाठी प्रत्येक हिंदूला सज्ज रहायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. शिरोली (पु) येथे २८ नोव्हेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने अधिवक्ता श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे हिंदु धर्माची संस्कृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. 
       या वेळी शिरोली (पु) ग्रामपंचायत समितीच्या सदस्या सौ. रूपाली खवरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुरेश यादव, सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सर्वश्री किरण दुसे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते. 

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनास 
जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! 

       या कार्यक्रमाच्या वेळी सनातन-निर्मित उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी व्याख्यानात स्त्रिया आणि मुली यांनी टिकली न वापरता कुंकू वापरण्याचे आणि लव्ह जिहाद षड्यंत्रापासून सावध रहाण्यासाठी सनातनने प्रकाशित केलेले लव्ह जिहादचे ग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कुंकवाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. प्रदर्शन स्थळी लव्ह जिहाद ग्रंथ आणि इतर उत्पादने यांचीही विक्री झाली. अनेकांनी लव्ह जिहादचा ग्रंथही घेतला.

via Blogger http://ift.tt/2gmAdlz




from WordPress http://ift.tt/2gKiUsA
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.