लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार आहे. पत्रकारांच्या लेखनीतुन अनेकांना न्याय मिळते. अशातच लेखनीसोबतच आता शहरवासीयांच्याही सेवेसाठी शहरातील पत्रकार समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक नगर परीषदेच्या निवडणुकीत दोन पत्रकारांचा विजय झाला असुन आता नगर परीषदेवर पत्रकारांचेही अजुन बारकाईने लक्ष राहणार आहे. शहरवासीयांच्या सेवेसोबतच पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
स्थानिक नगर परीषदेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ३ मधुन संजय मोटवानी व प्रभाग क्रमांक ६ म्हणुन सतपाल वरठे हे दाेघे पत्रकार निवडुन आले आहे. संजय मोटवानी हे एका दैनिकामध्ये तालुका प्रतिनीधी म्हणुन कार्यरत असुन अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे तालुका सचिव सुध्दा आहे. सतपाल वरठे हे आज तक वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत आहे. या पत्रकारांनी लेखनीतुन अनेकांना न्याय मिळवुन दिल्यानंतर शहरवासीयांच्या सेवेसाठी नगर परीषदेची निवडणुक लढविली. जनतेचे पत्रकारांवर विश्वास ठेवला व दोघांनाही बहुमताने निवडुन देवुन नगर परीषदेमध्ये पाठविले आहे. दोन पत्रकार निवडुन येणारी चांदुर रेल्वे नगरपरीषद ही जिल्ह्यातील एकमेव नगरपरीषद बनली आहे. स्थानिक पत्रकारांचे पहिलेपासुन नगर परीषदेवर लक्ष असतांना आता दोघांच्या निवडीमुळे पत्रकारांचे अजुन बारकाईने लक्ष राहणार आहे. अशातच शहरात एक पत्रकार भवन व्हावे अशी इच्छा स्थानिक पत्रकारांची अनेक दिवसांपासुन आहे. दोन पत्रकार नगर परीषद निवडुन आल्यानंतर शहरवासीयांच्या सेवेसोबतच पत्रकार भवनासाठी जागा पाहुण त्यानंतर निधीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच लोकप्रतिनीधी व पत्रकार म्हणुन समान काम करणार असल्याचेही सांगितले.
via Blogger http://ift.tt/2fSQM7M
from WordPress http://ift.tt/2fSTzOu
via IFTTT
No comments:
Post a Comment