आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी |
वाराणसी – बंगालमध्ये हिंदूविरोधी दंगली करणारे आणि हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांधांवर केंद्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, आतंकवाद आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणारे आणि धर्मांतर करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी, देशभरातील पीस स्कूलच्या सर्व विद्यालयांवर बंदी घालावी, तसेच कर्नाटक आणि केरळ येथील हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणांचा संपूर्ण तपास न करणे आणि दोषींवर कारवाई न करणे यांच्या विरोधात २४ नोव्हेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुल येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये इंडिया विथ विझडम्, हिंदु युवा वाहिनी, हिंदु शक्ती सेना, भारत विकास परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य धर्माभिमानी हिंदुत्वनिष्ठ कार्यकत्यांनी सहभाग घेतला.
via Blogger http://ift.tt/2gAgRd2
from WordPress http://ift.tt/2gQgZFM
via IFTTT
No comments:
Post a Comment