श्री. गिरीश बापट (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते |
पुणे– अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता. अंनिसविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद घेत सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालामध्ये अंनिसवरील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करून अंनिसवर प्रशासक नेमावा असे सूचित केले होते. नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही अंनिसची एफ्सीआर्ए नोंदणी रहित केली होती. या पार्श्वभूमीवर घोटाळेबाज अंनिसची सखोल चौकशी करून बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीपक आगवणे आणि गजानन केसकर उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2fKAZIp
from WordPress http://ift.tt/2gDDFq0
via IFTTT
No comments:
Post a Comment