Latest News

सावंगी मग्रापुर ची वाटचाल आता खरे आदर्श गावाकड़े – बापट कुटुंब सरसावले सावंगी च्या विकासा साठी – विदेशी पाहुण्यांनी केले वाचनालयाचे उद्घाटन..

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-


 चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर हे गाव आता खरेच आदर्श गावची वाट चाल करीत असल्याचे दिसत आहे.  यापूर्वी सुद्धा आदर्श ग्राम पुरस्काराने गाव सन्मानित झाले होते. पण अंतर्गत कलह कायम असल्याने गाव एकते पासून वंचित राहीले आहे. अक्ट्रोसिटी सारखे गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. मात्र बापट कुटुंब गावची पूर्वीची ओळख नामशेष करुण एक नवीन आदर्श गाव निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. आता  वादाच्या गावात ज्ञानाची बीजे रोवली जात आहे. त्या मुळे सर्व ग्रामवासी आनंद व्यक्त करीत आहे. या गावाचे नसीब बदलवण्याचा वसा विश्रामजी बापट यांनी घेतला आहे.  जापान चे विदेशी पाहुणे गावात आणून त्यांचे हस्ते वाचनालयाचे उद्घाटन केले.

     नुकतेच चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर येथील विश्रामजी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नवयुवकांनी सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय चालु करुन वाचनालयाचे उद्घाटन अतीशय उत्साहात करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्रामजी बापट यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या फोटोचे पुजन  करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे जपानचे  सौर ऊर्जाचे संशोधक ताजिमा तोशिओ व ईनामोटो हितोमी  (जपान) हे प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांचे ग्रामवासियांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे  विशेष आकर्षण ही जापनीज पाहुणे ठरले. यावेळी
सावंगी मग्रापूरच्या ग्रामस्थांचा जपानच्या पाहुण्यांसोबत ग्राम विकासाचा संकल्प केला.
 गावातील तरूणांच्या पूढाकाराने सुरू झालेले हे वाचनालय तरूणांच्या श्रमदान व ग्रंथ दानातून सज्ज झाले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सुमारे ५०० लहान मुले, पुरुष ,महिलांनी येत्या ५ वर्षात गावाचा कायापालट करण्याचा संकल्प केला. जपानच्या पाहुण्यांनी ग्राम विकासाला शुभेच्छा देऊन सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावंगीचे सुपुत्र डॉ. विश्राम नीळकंठ बापट यांनी भुषविले.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद सोनोने ,शेख जुनेद ,सचिन ढोक ,भोजराज सोनोने ,लखन बोरकर ,दिनेश बोरकर ,सागर आसोडे ,प्रशिक सवाई  , अश्विनी चोखांद्रे ,सुजाता सोनोने ,वैशाली सोनोने , अजय दांडगे .भुवनेश्वर सुखदेवे  तसेच  विजय दांडगे ,केतन सोनोने ,आकाश गडलिंग , अमित ईगोंले, ईन्दपाल मोंढे अंकुश ईगळकर प्रशात सोनोने , अमर बोरकर, गौतम माहुरे , आदींनी अथक परीश्रम घेतले.

via Blogger http://ift.tt/2fFWMTc




from WordPress http://ift.tt/2fT0M0P
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.