आरोपीला चांदुर रेल्वे पोलीसांनी केले जेरबंद
मतदान करून परत येत असताना कुटुंबावर घडला अनर्थ
चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान)
घुईखेड या गावी परत येत असताना पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कुटुंबाला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रक ने जबर धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती व चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपुर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर घुईखेड जवळ घडली.
सविस्तरवृत्त असे की, मनोज ज्ञानेश्वर पवार (वय 38 वर्ष ), पत्नी ज्योत्स्ना मनोज पवार (वय 32 वर्ष) व मुलगा रेवाशु मनोज पवार वय 2 वर्ष हे घाटंजी ला नगर परिषद चे मतदान आटोपून बुधवारी परत घुईखेडला येत असतांना नागपुर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर घुईखेड- तळेगावच्या मधात घुईखेडवरून १ किमी. अंतरावर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चिमुकल्या रेवाशु ला तहान लागल्याने आपली दुचाकी क्र. एम एच 32 एच 904 रस्त्याच्या कडेला उभी करून आई जोत्सना रेवाशुला पाणी पाजत असताना अचानक मागून मालवाहू पिकअप क्र. एम एच 32 क्यू 5847 ने भरधाव वेगात निष्काळजीपने धडक दिली. यामध्ये आई ज्योत्स्ना हि घटना स्थळीच दगावली तर पती मनोज व चिमुकला मुलगा रेवांशु गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर आरोपी मालवाहूसह चालक याने घटना स्थळावरून पळ काढला. मात्र सातेफळ फाट्यावर आरोपी चालक रवि दिवाकर गोल्हेर (३५) रा. घोडेगाव चांदुर रेल्वे पोलीसांनी पकडले असून तळेगाव दशासर पोलिसांनी चालका विरुद्ध कलम 279, 337, 304(अ) नुसार गुन्हा नोंदवून चालकाला अटक केली. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे..
via Blogger http://ift.tt/2fFZOXj
from WordPress http://ift.tt/2gzOYyQ
via IFTTT
No comments:
Post a Comment