Latest News

चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणूकीत 70 टक्के मतदान -उद्या सकाळी १० वाजता होणार मत मोजनीला सुरूवात

एकाच ईव्हिएमवर नगराध्यक्ष व नगरसेवकांची नाव असल्याने मतदारांचा उडाला गोंधळ

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /–

अपंग बांधवानी हि बजावला मतदानाचा हक्क 

चांदूर रेल्वे नगर पालीकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगर अध्यक्षसह १७ नगरसेवक पदाकरीता आज (ता.२७) मतदान शांततेत पार पडले. आजच्या या निवडणूकीत ७० टक्के मतदार झाले असुन 6280 पुरूष व 5761 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्ष पदाचे सहा व नगरसेवक पदाचे १०२ उमेदवारांचे राजकिय भाग्य ‘ एव्हीएम मशीन ’ मध्ये बंद झाले आहे. या निवडणूकीत १७ हजार ३०६ मतदारांपैकी 12042 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीसाठी एकूण  आठ प्रभागात २५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.या निवडणूकीसाठी दोन झोनल अधिकारी व २०० मतदान अधिकारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसडिओ ललीत वऱ्हाडे, सहा.निवडणूक अधिकारी म्हणुन दिनेश बढिये, श्रीकांत विसपुते यांनी काम पाहिले.

एकच ईव्हिएम वर नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या नावामूळे गोंधळ

नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी एकच ‘ ईव्हिएम ‘वापरण्यात आल्याने मतदारामध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र प्रभाग क्र.आठ मध्ये पहायला मिळाले. प्रभाग क्र.आठ मधुन तीन नगरसेवकासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सुध्दा मतदान करावयाचे होते. परंतु त्यासाठी एकच ‘ईव्हिएम ‘ वर नगराध्यक्षसह निवडून द्यायचे तीन नगरसेवक उमेदवारांची नावे अ‍ॅडजेस्ट करण्यात आली. तर दुसऱ्या ईव्हिएमवर उरलेल्या उमेदवाराची नावे ठेवण्यात आली. त्यामूळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी उमेदवारांच्या नावासमोरील बटन दाबतांना मतदारामध्ये गोंधळ उडतांना दिसत होता. तसेच मतदानासाठी बराच वेळ लागत असल्याने मतदान केंद्राबाहेर  मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. वयोवृध्दांना याचा मोठा त्रास झाला. तर केंदअध्यक्ष ना  सतत उभे राहुन मतदारांना मतदान कसे करायचे हे समजावून सांगावे लागत होते.

उद्या सकाळी होणार मतमोजनीला सुरूवात

स्थानिक तहसील कार्यालयात सकाळी १० वा.मतमोजणीला सुरूवात होणार आहे़ प्रभागनिहाय मत मोजणी होणार असुन मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल राहणार आहे.त्यासाठी १२ मतमोजणी अधिकारी व ६ चतुर्थी श्रेणी कर्मचारी राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.एका प्रभागात दोन व शेवटच्या आठव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून द्यायचे असून प्रत्येक प्रभागाचा निकाल २० मिनिटात समजणार असून संपूर्ण निकाल १ वाजेपर्यंत हाती लागण्याची शक्यता आहे़ सरतेशेवटी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांची मतगणणा होणार आहे.
नगर परिषद निवडणूकीचा निकाल एैकण्यासाठी कार्यालयाबाहेर नागरिक मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाने जनतेला निकाल एैकता येण्यासाठी लाऊड स्पिकर ची व्यवस्था केली आहे़ या रस्त्यावर जनतेची होणारी गर्दी पाहता तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावरून एकेरी वाहतूकीची व्यवस्था राहणार आहे़

via Blogger http://ift.tt/2gvjuJz




from WordPress http://ift.tt/2gviQff
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.