Latest News

पराभवानंतर ही जिंकले विश्वकर्मा – नगर परिषद निवडणूक विश्लेषण


चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान)



 निवडणूक जिंकन्यासाठी सगळ्यात महत्वाची असते जातिचे गट्ठा मते, निलेश विश्वकर्मा हे अल्पसंख्यांक असल्यामुळे ते कधीही जनतेतून निवडून येऊ शकत नाही असा आत्मविश्वास ठेऊन गेल्या अनेक वर्षापासून सतत विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाला दुर्लक्षित ठेवणाऱ्या शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला काल पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने चांगलाच हादरा बसला आहे. निलेश विश्वकर्मा यांनी मात्र आपली हार झाली नसून आपण या निवडणुकीच्या माध्यमातून शहरातील अर्ध्याधिक मतदारांचे मन जिंकले असल्याचे समाधान व्यक्त केले. यामुळे निवडणुकीत जरी त्यांना हार पत्कारावी लागली तरी ते जिंकले असल्याचेच सर्वत्र चर्चा ऐकाला येत होती.
निलेश विश्वकर्मा हे वयाच्या 18 वर्षापासून कॉंग्रेस चे युवा नेता म्हणून तळ्यागळ्यातिल जनतेसाथी काम करीत आहे सुरवातीच्या काळात आ वीरेंद्र जगताप यांचे लाडके कार्यकर्ते म्हणूनही त्यांची छबी होती. परंतु त्यांचे नेतृत्व शैली, काम करण्याची पद्धत, व त्यांच्या कड़े आकर्षित होणारा युवा वर्ग हा मोठ मोठ्या लोकप्रतिनिधिला अचंबित करणारा राहिला आहे. त्यामुळेच की आणखी काही अंतर्गत बाबी मुळे आ. जगताप यांच्याशी त्यांचे फाटले होते. त्यानंतर आपला व्यवसाय सांभाळून, राहुल ब्रिगेड च्या माध्यमातून  ते वरच्या पातळीवर  कॉंग्रेस साठी काम करीत होते. यावेळी नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांनी सर्व मतभेद विसरून आ. जगताप यांना उमेदवारी मागितली होती. परंतु शहरातील इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दुखवून आ. जगताप त्यांना टिकिट देऊ शकले नाही हीच परिस्थिति भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचीही झाली. त्यामुळेच अपक्ष उमेदवारी भरून अवघ्या चार पाच निष्ठावान मित्रांसह श्री विश्वकर्मा हे मैदानात उतरले होते. एकीकडे आ जगताप यांचे नेतृत्व शैली, गावात जागोजागी कार्यकर्त्यांची फौज, दांडगा राजकीय अनुभव,  गावातील इतर मात्तबर मंडळी यांना नगरसेवक पदी उमेदवारी देऊन व निवडणुकीत कोणालाही लहान समजायचे नाही या शैलीमुळे त्यांनी आपल्या राजकीय परिपक्वतता दाखविली होती व त्यामुळेच त्यांना आपली पत राखता आली. असे असतांना विश्वकर्मा यांचे निवडणूक प्रचार यंत्रणा, नियोजन बद्ध आखणी, सभेतील भाषणे, वचननामा, त्यांचे लक्षवेधी आश्वासने, रोड शो, इत्यादि सर्वच युवकांना व सामान्य मतदारांना आकर्षित करणारे ठरले. त्यामुळेच भाजप, राष्ट्रवादी, व जातीचे गट्ठा मते सांगणाऱ्यांना मागे टाकत त्यांनी कॉंग्रेस च्या उमेदवाराला निकराची झुंज दिली. या निवडणुकीच्या मतमोजनीच्या वेळी सर्वांचेच हृदयाचे ठोके वाढले होते. कॉंग्रेस ला आपली लढत भाजप सोबतच होईल अशी अपेक्षा असतांना निलेश विश्वकर्मा यांची मतांची आघाडी पाहून थोड्यावेळा साठी तरी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची चांगलीच दानादान उडाली होती. अशा स्थितीत 215 मतांची आघाडी घेत कॉंग्रेस चे शिट्टु सूर्यवंशी विजयी झाले व कॉंगेस गटात आनंद व्यक्त झाला. इकडे मात्र पराभवा नंतरही विश्वकर्मा यांचे समर्थक मोठ्या संखेने त्यांच्या कार्यालयात गर्दी करुण होते. यावेळी अनेक समर्थकांना आपले अश्रु आवरता आले नाही. निलेश विश्वकर्मा तुम आगे बढ़ो हम तुमारे साथ है या घोषणांनी जूना स्टैंड परिसर दनानुन गेला होता, तर शहरातील अनेक भागात शोककळा पसरल्याचे दिसत होते. तर दुसरीकडे भाजपमधे निलेश विश्वकर्मा यांना टिकिट नाकारुण चूक केल्याचा पश्चाताप स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या सर्वांमध्ये जिल्ह्यात सगळीकडे भाजप जिंकत असतांना चांदुर रेल्वे मध्ये 10 नगरसेवक व अध्यक्ष निवडून आणत आपल्या परिपक्व राजकीय नेतृत्वाचा परिचय आ. वीरेंद्र जगताप यांनी पुन्हा दाखवून दिला हे विशेष.

via Blogger http://ift.tt/2g8CT3a




from WordPress http://ift.tt/2gzLP2j
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.