Latest News

चांदुर रेल्वे शहर स्वच्छ, सुंदर, समृध्द व भ्रष्टारमुक्त करणार – श्री नितीन गवळी​ ( नगराध्यक्ष पदाचे उमेदवार – तिसरी आघाडी )

अमरावती- (विशेष प्रतिनीधी)-     

निवडणूक नगराध्यक्ष पदाची 
श्री नितीन गवळी​ ( नगराध्यक्ष पदाचे उमेदवार – तिसरी आघाडी )
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील नगर परीषदेची निवडणुक अटीतटीची होत असुन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरस बघावयास मिळत आहे. अशातच विविध राजकीय पक्षांची प्रचाराची रणधुमाळी सुरू असुन तिसऱ्या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन गवळींचा बोलबाला शहरभर पहावयास मिळत असुन नगराध्यक्ष झाल्यास चांदुर रेल्वे शहर स्वच्छ, सुंदर, समृध्द व भ्रष्टारमुक्त करण्याचा नितीन गवळींचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

     चांदुर रेल्वे येथे सुरू असलेल्या निवडणुकीचा विविध प्रकारे प्रचार केला जात आहे. नितीन गवळींचा प्रचार सध्या शहरात सर्वांत हटके असल्याचे दिसत आहे. पथनाट्याव्दारे शहरात तिसऱ्या आघाडीचा प्रचार केल्या जात आहे. अनेक वर्षांपासुन चांदुर रेल्वे नगरपरीषदेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे जिल्हाभर गाजले आहे. अशातच चांदुर रेल्वे शहर स्वच्छ, सुंदर, विकसीत बनविण्यासोबतच नगर परीषद भ्रष्टाचारमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. नितीन गवळींना मत देवुन भ्रष्टाचारमुक्त मोहमीमेत सहभागी होण्याचे आवाहन तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते करतांना दिसत आहे. अशातच नितीन गवळी सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी झटणारे एक उमदे नेतृत्व असुन मला एकदा शहराचा विकास करण्याची संधी दिल्यास आपण मतदारांच्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही, असा विश्‍वासही नितीन गवळींनी आमच्या प्रतिनीधीजवळ व्यक्त केला. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नितीन गवळी हे मोठी टक्कर देत असून शहरातून त्यांना मोठय़ा प्रमाणात सर्मथन मिळत आहे. तरुण कार्यकर्त्यांपासुन ते वृध्दांपर्यंत स्वयंस्फूर्तीने नितीन गवळींच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र चित्र स्पष्ट येत्या २७ नोव्हेंबर नंतरच होणार आहे.

via Blogger http://ift.tt/2fYROQq




from WordPress http://ift.tt/2ffaMTG
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.