भाषण करतांना श्री. अजयसिंह सेंगर |
पनवेलमध्ये संविधानदिनाला विरोध !
पनवेल – भारतात मुसलमानांना वेगळे कायदे करून त्यांच्यासाठी चार पत्नी आणि त्यांना तलाक देण्याची सोय केली. ही बाब धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी खेदजनक आहे. देश जातीयवाद आणि धर्मवाद याला तोंड देत आहे. कायदे सक्षम नसल्यामुळे समाज दोन भागांत विभागला गेला आहे. अशामुळे देशाचा विकास कसा होईल ? जाती आणि धर्म यांत विष निर्माण करणारी व्यवस्था सर्वश्रेष्ठ कशी, असा प्रश्न महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकुर अजयसिंह सेंगर यांनी उपस्थित केला. पनवेलमध्ये पृथ्वी सभागृह येथे संविधान निषेध सभा और विषमता दिन या कार्यक्रमात ते बोलत होते. यामध्ये संविधानाच्या मर्यादा सांगण्यात आल्या. या वेळी नेहरूंच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकुर अजयसिंह सेंगर म्हणाले –
१. वर्ष १९३६ मध्ये इंग्रजांनी जो इंडिया अॅक्ट आणला त्याची नक्कल करण्यात येऊन त्यापासून संविधान बनवले गेले.
२. हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी आरक्षण आणण्यात आले. त्यामुळे शिक्षण, राजकारण आणि समाज यांत विषमता आली. सर्व सरकारे मतपेढीसाठी आंबेडकरांचा उदोउदो करत आहेत.
३. ही लाजीवरवाणी गोष्ट आहे की, ज्यांनी हिंदु धर्म तोडला ते नेहरू, मदर तेरेसा यांना भारतरत्न देण्यात आले आहे.
via Blogger http://ift.tt/2fZ4WBX
from WordPress http://ift.tt/2gqv0Xw
via IFTTT
No comments:
Post a Comment