Latest News

नोटबंदी निर्णयाविरोधात उद्या भारत बंद ला जनता दल (से.) चा जाहीर पाठिंबा – बंदमध्ये कार्यकर्त्यांना सामिल होण्याचे आवाहन

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-


केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीच्या नावाखाली शेतकरी व सर्वसामान्यांचा छळ चालविला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठविला असून सर्वच विरोधी पक्षांनी उद्या २८ नोव्हेंबर रोजी
आक्रोश दिन पाळण्याचे ठरविले आहे. या
दिवशी संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आक्रोश केला जाईल. या बंदला महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चा जाहीर पाठिंबा असुन या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी सामिल होण्याचे आवाहन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोलेंनी केले आहे.
    देशभर या नोटाबंदीच्या निर्णयामुळे हाहाकार माजला आहे. लोकांचा जीव जातो आहे. अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे, संताप आहे. त्यांच्या या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात तसेच सरकारला जागे करण्यासाठी विरोधी पक्षांतर्फे उद्या भारत बंद ठेवण्यात येणार आहे. नोटाबंदीमुळे देशभरात आर्थिक अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा निर्णय काळ्या
पैशाविरुद्धच्या लढाईचा एक भाग असल्याचा दावा सरकार करीत असले तरी त्यामुळेससर्वसामान्य जनताच वेठीस धरली गेली आहे. हा निर्णय पुरेशा तयारीविनाच राबविल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा निर्माण होऊन दैनंदिन व्यवहार बाधित झाले आहेत. रब्बीची पेरणी, लग्नसराई, व्यापार-
उदीम, वैद्यकीय उपचार आदी महत्त्वाची कामे
अडचणीत आली आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत बंदला महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चा जाहीर पाठिंबा असुन या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी सामिल होण्याचे आवाहन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोलेंनी केल्याचे जनता दल कार्यालयीन सचिव संजय डगवार यांनी प्रसिध्दीपत्रकातुन कळविले आहे.

via Blogger http://ift.tt/2fBQ2Eh




from WordPress http://ift.tt/2gfYs2d
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.