पोलीस ठाण्यात पाऊण घंटा ताटकळत ठेवले !
तक्रारदाराला नाहक दिलेली ही शिक्षा आहे. अशा पोलिसांविषयी
त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणे आवश्यक आहे !
मुंबई – फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथील २० व्या शतकातील भारतीय कला या नावाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ही तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांना कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार न स्वीकारता पोलिसांनी पाऊण घंटा ताटकळत ठेवले. तक्रार देतांना श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)चे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले हेसुद्धा उपस्थित होते. अखेरीस माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आली. येथील पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी म.फि. हुसेन यांच्या चित्रांवर कारवाई केल्यास तुमच्यासमोर झुकल्यासारखे होईल, असे सांगून प्रारंभी प्रतिसाद देण्याचे टाळले.म.फि. हुसेन यांनी काढलेले भारतमातेचे नग्न चित्र आणि हिंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे यांविषयी माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर बाहेर गेले आहेत, अर्ध्या घंट्यानंतर येतील. आल्यावर त्यांच्याशी बोला, असे खोटे सांगितले. प्रत्यक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर आतल्या खोलीत विश्रांती घेत होते. ते पाऊण घंट्याने बाहेर आले. धर्माभिमान्यांना पोलिसांचा खोटेपणा लक्षात आल्यावर पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी आदल्या रात्री कामामुळे झालेल्या जागरणामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांती घेत असल्याचे सांगितले. या वेळी धर्माभिमान्यांनी वरिष्ठ अधिकारी आतच होते, हे त्याच वेळी सांगितले असते, तर आम्ही थांबून राहिलो नसतो, असे सांगितले. त्यावर आमच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो, असे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी डीएजी मॉडर्न आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नाही, असे सांगून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. (हिंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे काढणार्या कलाकाराच्या चित्रांच्या प्रदर्शनावर कारवाई न करणार्या पोलिसांनी अन्य धर्मियांविषयी अशीच सूचना केली असती का ? – संपादक)
माहिती घेतली; मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ !
माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात धर्माभिमानी तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात न लावण्याविषयी तुमच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत आहे का ?, असे दरडावून विचारले. यावर धर्माभिमान्यांनी दरडावून विचारण्याचे कारण विचारले असता, त्यानंतर त्यांनी विषय समजून घेतला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी २ पोलीस अधिकार्यांना धर्माभिमान्यांसोबत डीएजी मॉडर्न येथे व्यवस्थापकांना भेटण्यासाठी पाठवले. या ठिकाणी पोलिसांनी आतमध्ये जाऊन डीएजी मॉडर्नच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा केली. त्यानंतर पोलिसांसोबत बाहेर येऊन व्यवस्थापकांनी याविषयी पर्यायी मार्ग निघतो का ? हे पडताळून तुम्हाला कळवतो, असे धर्माभिमान्यांना सांगून वेळ मारून नेली; मात्र तेथून पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट करून घेतली.
via Blogger http://ift.tt/2fU95r6
from WordPress http://ift.tt/2fpPVgs
via IFTTT
No comments:
Post a Comment