Latest News

*अचलपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभेला उलटला जनसागर*

अचलपूर  / श्री प्रमोद नैकेले :-




              अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी व अ वर्ग नगरपालिका असलेल्या अचलपूर नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या नीलिमा रूपेश ढेपे व ३२ नगरसेवकांचे प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली.यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे,जिल्हा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी,प्रमोद कोरडे,अशोकराव बन्सोड,अभय माथने,निलेश सातपूते,गजानन कोल्हे,जयंत आमले,कचरूलाल पटवारी,सुधीर रसे,रूपेश ढेपे, नगराध्यक्ष पदाच्या नीलिमा ढेपे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विचारपिठावर उपस्थीत होते.मुख्यमंत्र्यांचे स्वागत जगदंब विणकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकार व मुख्याध्यापक गजानन बाबरेकर ,सर्व उमेदवार व विविध संघटना क्रिकेट क्लब व व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी केले
        प्रास्ताविक निलीमा ढेपे यांनी केले.दिनेश सूर्यवंशी,प्रवीण पोटे यांनी आपले विचार मांडले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनात  भाजपा सरकार च्या विविध योजनांचा उल्लेख केला.अचलपूर करिता २४ कोटीची अमृत योजनेत शुध्द व स्वच्छ पाणी योजना मंजूर केल्याचे सांगत रहदारी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी अमरावती बैतूल ,अकोला बैतूल या दोन्ही रस्त्याचे दोनपदरी रस्त्यात रूपांतर करणारी केद्रातून उडाण योजना आणली.केंद्रात व राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यावर भर दिला आपण नगरपालिकेत आमचा नगराध्यक्ष व ३२ नगरसेवक निवडून पाठवा व पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे मार्फत प्रस्ताव सादर करा आम्ही लागेल तेवढा निधी मंजूर करून
या ऐतिहासिक शहराचा विकास घडवून आणण्यास कटीबध्द आहोत.सामान्य गटातील विद्यार्थ्यांना मुद्रा बँक योजनेतून उच्चशिक्षणाकरीता ५०‰ मदत देण्यात येते.बचतगटाच्या महिलांना ५०००० पर्यंत शुन्यटक्के व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.महिलांना स्वयंरोजगार मीळावा त्यांच्या गृहउद्दोगाला वाव मीळावा म्हणून केवळ महीलांकरीता माँल निर्माण करण्याची योजना आहे तुम्ही नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्या आम्ही त्यांचे मार्फत तुम्हाला माँल देण्यात विलंब लावणार नाही.नरेंद्र मोदींच्या सर्वाकरीता घर योजनेत आपल्या शहराला झोपडपट्टी मुक्त करण्यास राज्यसरकार नीलिमा ढेपे नगराध्यक्ष झाल्यास सदैव पाठीशी राहील,साठ वर्षांत जे या देशात झाले नाही ते केवळ दोन वर्षांत करून दाखवली दोन वर्षांत आपल्या राज्यातील शंभर गाव हागणदारीमुक्त केले येणा-या काही वर्षांत उर्वरीत गावसुध्दा हागणदारी मुक्त करून स्वछ भारत हे सरकारचे कर्तव्य आहे.गावात घनकचरा साचून होणारा त्रास कमी करण्यासाठी कच-यावर प्रक्रिया करून त्याचे शेतीपयोगी खत बनवण्यात येईल,कच-यापासून विद्युत निर्मिती प्रकल्प पूर्णत्वास नेवून कच-याला संपत्तीत बदलायचे आहे.तसेच जे कधी होवू शकले नाही ते नरेंद्र मोदी यांनी केवळ एका क्षणात करून दाखवले ८ नोव्हेंबर ला ऐतिहासिक निर्णय घेवून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करून एका निशान्यात तीन शिकार केले एक म्हणजे काश्मीर मधे आंतकवादी संघटना याच नोटा देवून स्थानीक लोकांना दहशत निर्माण करण्यास लावत आज दगड मारायला कुणीच त्यांना सापडत नाही,दुसरा पाकिस्तानने भारताच्या चलनी नोटा छापून त्याचा वापर देशात आंतक पसरवण्याकरीता करत होता त्या नोटा केवळ कागदाचे तुकडे करून टाकले,तिसरे म्हणजे देशातील धनाढ्य काळापैसा साठवणारे पैशाचे जोरावर मदमस्त झाले त्यांना रस्त्यावर आणून सामान्य नागरिकांना ताठ मानेने जगण्याचा हक्क दिला.सामान्य नागरिकांना थोडा त्रास होत आहे पण स्वातंत्र्यानतंर  हे आर्थिक स्वातंत्र्य आहे आम्ही मोंदीचे सैनिक आहोत पन्नास दिवस लढा पुढील कित्येक वर्षे आनंदाचे जिवन जगण्याचा मार्ग आपल्याला नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.स्वच्छ,भ्रष्टाचार मुक्त देश बनत आहे यामध्ये सहभागी होऊन एक सर्व प्रदूषण मुक्त आपले  विकसित शहर बनवण्याकरीता आपण येणा-या २७ नोव्हेंबर ला भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे जाहीर आव्हान त्यांनी स्थानीक जगदंब विद्यालयाचे प्रांगणा जमलेल्या अफाट जनसागराला केले व एक भाजपा मय लहर निर्माण केली मतदारांनी या जुळ्या शहरातील विकासाचा मुद्दा लक्षात ठेवून मुख्यमंत्र्यांच्या जाहीर आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला.

via Blogger http://ift.tt/2glTwId




from WordPress http://ift.tt/2glRoR5
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.