ओबीसी महासंघाचा अधिवेशनात हिंदूंचाच (OBC) धर्मातील ग्रंथ जाळल्या जातात
- प्राचीनतम हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन आज सर्व जग भारताकडे आशेने पहात आहे. त्यामुळे इंग्रज-निर्मित जातीद्वेषी राजकारणाची री ओढणार्यांनी स्वार्थ सोडून देऊन स्वहित आणि राष्ट्रहित साधावे !
नागपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात राज्यस्तरीय महिला महाधिवेशनात सहभागी झालेल्या महिलांकडून मनुस्मृति या हिंदूंच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले.
या महिलांचे म्हणणे होते की,
१. इतर मागास प्रवार्गाला (ओबीसी) संविधानाने दिलेले अधिकार मिळालेले नाहीत. हा समाज अजूनही संवैधानिक अधिकारापासून वंचित आहे. महिलांची स्थिती तर त्याहून बिकट आहे.
२. मनुस्मृति जाऊन संविधान लागू झाले, तरी अजूनही समाजमनावर मनुस्मृति ठाण मांडून आहे, असा दावा आयोजकांनी या वेळी केला.
३. छायाचित्रापुरते हे दहन होऊ नये, तर महिलांनी वडाची पूजा आणि इतर कर्मकांड करणे बंद करावे. मनुस्मृतीला आता मनातून तिलांजली द्या, असे आवाहन सुशिला मोराळे यांनी या वेळी केले.
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी आहेत. ते तेली जातीचे नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असतांना गाझी ही त्यांची जात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केली.
via Blogger http://ift.tt/2gAeh6V
from WordPress http://ift.tt/2gQo7lR
via IFTTT
No comments:
Post a Comment