थेट जनतेतुन नगराध्यक्ष व १७ नगरसेवकपदांसाठी नगर परिषद निवडणुकीचे आज मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला असतांना नगराध्यक्ष पदातील अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे
नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 102 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. शहरातील एकूण लोकसंख्या 25 हजार असली तरी प्रत्यक्षात मतदार 18 हजार आहे. नगराध्यक्ष पदातील चौरंगी लढत होणार असुन 4 ते 5 हजाराच्या जवळपास मतदान विजयी उमेदवाराला मिळवावे लागतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीसाठी पोलिस, तहसील कार्यालय,नगर परिषद व इतर कार्यालयाचे एकूण 200 कर्मचारी व्यवस्था सांभाळून आहे. एकूण 25 मतदान कक्ष शहरात असून मतदारांना धावपळ होणार नाही यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ललित वऱ्हाडे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दिनेश बढ़िये काम पाहत आहे..
via Blogger http://ift.tt/2g4MsTH
from WordPress http://ift.tt/2fmqKv9
via IFTTT
No comments:
Post a Comment