विडी घरकुल येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे आणि समोर उपस्थित समुदाय |
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे (डावीकडून दुसरे) यांना सभेचे अंक आणि निमंत्रण देतांना समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट (उजवीकडून तिसरे) |
आणि मुलींनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. अनिता बुणगे
आज हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास या समस्या उरणार नाहीत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांनी केले. सभेनिमित्त विडी घरकुल येथील समाज मंदिरात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याचे आयोजन श्री. सुधीर पेंडिले, विशाल येमुल आणि त्यांचे सहकारी यांनी केले. मेळाव्यापूर्वी आयोजकांची भेट घेऊन त्यांना धर्मसभेचे महत्त्व सांगण्यात आले. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी मेळावा आयोजित केला. अन्य ठिकाणीही अशा स्वरूपाच्या मेळाव्यांच्या आयोजनासाठी ते प्रयत्नरत आहेत. मेळाव्याला ७५ महिला आणि २५ पुरुष उपस्थित होते.
१. मेळाव्याचा प्रारंभ महिलांना कुंकू आणि पुरुषांना टिळा लावून झाला.
२. या वेळी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.
सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने ४ डिसेंबरला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळावे, बैठका आणि वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून प्रसारास वेग आला आहे. समाजातूनही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
via Blogger http://ift.tt/2g1cHuh
from WordPress http://ift.tt/2fimiO5
via IFTTT
No comments:
Post a Comment