चांदुर रेल्वे नगरपरीषदेची एकुन १७ नगरसेवकांसाठी ८ प्रभागात निवडणुक होत आहे. यामध्ये भाजप, कॉंग्रेस, तिसरी आघाडी, राष्ट्रवादी या पक्षांसह अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. अशातच प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपचे संजय मोटवानी, प्रभाग क्र. ६ मध्ये बाळासाहेब सोरगिवकर व प्रभाग क्र. ७ मध्ये सौ. सारीका अभिजीत तिवारी यांची स्थिती मजबुत मानली जात आहे..
चांदुर रेल्वे नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी होऊ घातलेली निवडणूक चार दिवसांवर येवून ठेपली असल्याने निवडणूक प्रचाराची रंगत वाढली असून प्रचाराच्या भोंग्यांनी शहरत अक्षरश: दणाणून सोडले आहे. शहराचा संपूर्ण विकास व कायापालट करण्यासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्या, या आशयाच्या निवेदनाद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लोगल्ली उमेदवारांचे भोंगे लावलेले प्रचार वाहने गर्दी करीत आहेत. अशातच नगरसेवकपदामध्ये प्रभाग क्रमांक ३, ६ व ७ मध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचे बोलल्या जाते. प्रभाग ३ (अ) मध्ये भाजपाचे संजय मोटवानी, कॉंग्रेसचे आशिष कडु, तिसऱ्या आघाडीचे मेहमुद हुसेन यांमध्ये थेट लढत होणार असुन यामध्ये संजय मोटवानी यांचे पारडे जड आहे. तसेच प्रभाग क्र. ६ (अ) मध्ये भाजपाचे बाळासाहेब सोरगिवकर, कॉंग्रेसचे सुमेद सरदार, तिसऱ्या आघाडीचे गौतम जवंजाळ यांच्यात लढत होणार असुन बाळासाहेब सोरगिवकर यांना वाढता प्रतिसाद पाहता ते प्रबळ दावेदार मानले जात आहे. प्रभाग क्र. ७ (ब) मध्ये भाजपाच्या सौ. सारीका अभिजीत तिवारी, कॉंग्रेसच्या सौ. स्वाती मेटे, तिसऱ्या आघाडीच्या नलीनी सुलभेवार यांच्यात थेट लढत होणार असुन जनता सौ. सारीका तिवारी यांच्या बाजुने कौल देणार असल्याचे बोलल्या जात आहे. तर इतर ५ प्रभागांमध्येही कुठे तिहेरी तर कुठे चौरंगी लढत होत अाहे. मात्र सर्व १७ ही नगरसेवकपदांचे व नगराध्यक्षपदाचे चित्र येत्या २७ नोव्हेंबर नंतर स्पष्ट होणारच आहे..
via Blogger http://ift.tt/2gKgVYU
from WordPress http://ift.tt/2gKdgdK
via IFTTT
No comments:
Post a Comment