येथील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक बी. रमेश यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यकर्त्यांनी मनवीनगरच्या सार्वजनिक शिक्षण क्षेत्राचे उपसंचालक श्री. रमंजीनेय्या यांची भेट घेऊन त्यांना सनातनच्या ग्रंथांची माहिती दिली. यावर ते म्हणाले, हे ग्रंथ खूप उपयुक्त आहेत. याविषयी शाळांतील विद्यार्थ्यांना माहिती दिल्यास ते पुढे आदर्श व्यक्ती होऊ शकतात. या ग्रंथांची माहिती मी रायचूर जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुखांपर्यंत पोचवणार, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या वेळी मनवीनगरचे अधिकारी श्री. रीवन सिद्धय्या उपस्थित होते. श्री. सिद्धय्या म्हणाले, सनातनचे ग्रंथ सर्व शाळांमध्ये पोचणे आवश्यक आहे. हे ग्रंथ आम्हाला मिळतात हे आमचे भाग्य आहे. ग्रंथांच्या माध्यमातून सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत आहे.
via Blogger http://ift.tt/2fpQiHG
from WordPress http://ift.tt/2gwmpVX
via IFTTT
No comments:
Post a Comment