*चिंचवड,थेरगाव येथील गैरप्रकार!*
*पत्रकार संरक्षण समितीचे वतीने जाहीर निषेध!!!!*
थेरगाव चिंचवड येथील आदित्य बिर्ला रूग्णालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी चित्रीकरण करणा-या पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची घटना आज घडली. त्यानंतर पत्रकारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत या धक्काबुक्कीचा निषेध नोंदवला.
बिर्ला हॉस्पिटल येथे कॅन्सर रूग्णांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांसाठी कोणतीही बैठक व्यवस्था कार्यक्रमस्थळी कऱण्यात आलेली नव्हती. तसेच पोलिसांच्या तपासणीनंतर रूग्णालयाचे खासगी सुरक्षारक्षकही पत्रकारांची तपासणी करत होते. यावेळी या सुरक्षारक्षकांनी काही पत्रकारांशी गैरवर्तन करत हुज्जत घातली. तसेच चित्रीकरण करत असलेल्या पत्रकारांनाही धक्काबुक्की केली.
या घटनेनंतर संतापलेल्या पत्रकारांनी या धक्काबुक्कीचा निषेध करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच या कार्यक्रमाला प्रसिद्धी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
पत्रकार संरक्षण समिती चे वतीने बिर्ला हॉस्पिटल प्रशासनाचा जाहीर निषेध हि करण्यात आला आहे
via Blogger http://ift.tt/2fEs77b
from WordPress http://ift.tt/2guldin
via IFTTT
No comments:
Post a Comment