‘हिंदु धर्मावर होणारे आक्षेप आणि त्याचे खंडण’ याविषयी ह.भ.प. भगवान महाराज कोकरे म्हणाले, ‘‘कोकणाने हिंदवी स्वराज्य दिले. भारताच्या स्वातंत्र्याची ठिणगीदेखील कोकणातच पडली. त्याचप्रमाणे हिंदु जनजागृती समितीची स्थापना कोकणातच म्हणजे चिपळूणमध्ये झाली. सर्व धर्मांची जननी हिंदु धर्म आहे.
पंतप्रधान मोदींनी ‘जय श्रीराम’ म्हटले, तर धर्मद्रोह्यांनी देशात हाहाकार माजवला; मात्र ‘भारतमाता की जय’ न म्हणणार्यांच्या विरोधात हे धर्मद्रोही काहीच बोलत नाहीत. ज्या शासनाने हिंदु धर्मविरोधी अंधश्रद्धा कायदा पारित केला, ते शासन पुढे एक वर्षही सत्तेत राहिले नाही. हिंदूंच्या विरोधात काम कराल, तर हिंदू स्वत:ची शक्ती दाखवतील. सनातन संस्थेने वाईट काम केलेले नाही, करत नाही आणि पुढे करणारही नाही; मात्र सनातनच्या विरोधातील बातमी छापण्यासाठी सर्व पीतपत्रकार पुढे येतात. जे हिंदु धर्म सोडून गेले आहेत त्यांना आमच्या धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही. आम्हाला कलंकित करणारेच पुढे कलंकित होतील. सनातन संस्था हा संप्रदाय नाही, तर ती हिंदु धर्माचे कार्य करणार्याचा सेनापती आहे.’’
via Blogger http://ift.tt/2gE4Wfv
from WordPress http://ift.tt/2gclOJ0
via IFTTT
No comments:
Post a Comment