सोलापूर येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा
ग्रामदैवत सिद्धेश्वराला हार आणि श्रीफळ अर्पण करतांना कार्यकर्ते |
सोलापूर – येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ४ डिसेंबर २०१६ या दिवशी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसारासाठी देवतांचे आशीर्वाद मिळावेत; म्हणून समितीच्या वतीने नुकतेच येथील ग्रामदैवत सिद्धेश्वराला हार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आले, तसेच श्री रूपाभवानीदेवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर सभेच्या प्रसारास उत्साहाने प्रारंभ केला.
या वेळी पद्मशाली समाजाचे सत्यनारायण गुर्रम, माजी नगरसेवक बापू ढगे, आजोबा गणपती ट्रस्टचे गंगाधर गवसने, शिवसेना विभागप्रमुख संजय साळुंखे, समितीचे कार्यकर्ते आणि रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
via Blogger http://ift.tt/2fi6PMj
from WordPress http://ift.tt/2gbDd2v
via IFTTT
No comments:
Post a Comment