इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर)- –
येथे थोरात चौकात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आयोजित केलेली जाहीर सभा धर्माभिमान्यांच्या विरोधामुळे संयोजकांना रहित केली. त्यामुळे ओवैसी इचलकरंजी येथे न येता परस्पर मिरजहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.
३ ठिकाणी एम्.आय.एम्. पक्षाची सभा रहित करून ओवैसी यांना जिल्हा बंदी करावी, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात दिले होते. इचलकरंजी येथे हिंदूंनी सभेला विरोध दर्शवून सभा रहित करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. २० नोव्हेंबर या दिवशी दुपारी २ वाजता येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा न होण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्व धर्माभिमान्यांना याची माहिती दिली. सभेपूर्वी बजरंग दलाचे सर्वश्री संतोष उपाख्य बाळ महाराज, संतोष हत्तीकर, उत्तम पाटील, वैभव फडणीस, गणेश धुमाळ, बिरंजे, भरत पोवार आदी असे ८० ते १०० धर्माभिमानी संघटित झाले होते.
via Blogger http://ift.tt/2fi9DZT
from WordPress http://ift.tt/2fJ00ns
via IFTTT
No comments:
Post a Comment