Latest News

अ.भा. ग्रा. पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री अमोल गवळी तर निरीक्षकपदी बाळासाहेब सोरगिवकर

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-
जिल्हा उपाध्यक्षपदी श्री अमोल गवळी

अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारीणी नुकतीच घोषीत करण्यात आली. यामध्ये पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल गवळी तर जिल्हा निरीक्षकपदी बाळासाहेब सोरगिवकर यांची निवड करण्यात आली.

निरीक्षकपदी बाळासाहेब सोरगिवकर


       अमरावती येथील हॉटेल राधेय येथे नुकतीच  अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने हे होते तर विशेष अतिथी म्हणुन प्रदेशाध्यक्ष जळगाव येथील बापुसाहेब देशमुख, केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसुधनजी कुलथे, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक पवार, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ जाधव, प्रकाश नागरे, प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, विदर्भ अध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदेश संघटक शफीक शेख, जेष्ठ पत्रकार वसंतराव कुळकर्णी, अमरावती जिल्हाध्यक्ष कदम, जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल गवळी तर जिल्हा निरीक्षकपदी बाळासाहेब सोरगिवकर यांची नियुक्ती करण्यात आली. अमोल गवळी तालुकाध्यक्ष असतांना त्यांच्या कार्यकाळात पत्रकार संघटनेतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. तसेच बाळासाहेब सोरगिवकर यांनी संघटना मजबुतीसाठी अनेक कार्य केले. याचीच दखल घेवुन दोघांची नियुक्ती करण्यात आली.
         त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे,  अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष युसुफ खान, तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, धिरज नेवारे, सचिव प्रा. रविंद्र मेंढे, कोषाध्यक्ष मनिष खुने, संजय मोटवानी, विवेक राऊत, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, मंगेश बोबडे, शहेजाद खान, मधुकर बावने, अमर घटारे, प्रा. सुधिर तायडे, विनय गोटेफोडे, राहुल देशमुख, प्रा. प्रसेनजित तेलंग, अजय गावंडे, हनुमंत मेश्राम, राजेश सराफी आदींनी अभिनंदन  केले आहे.

via Blogger http://ift.tt/2nHTfTK




from WordPress http://ift.tt/2m4691Z
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.