Latest News

नवीन ठाणेदार करणार का पत्रकार हल्ला प्रकरणाची पुन्हा चौकशी ? अनेकांचे लागले लक्ष

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –


सगळीकडे दिवसेंदिवस लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ले वाढतच चालले आहे. अशातच शहरातसुध्दा एक पत्रकार हल्ला प्रकरण घडले. मात्र या प्रकरणात स्थानिक पोलीसांनी केवळ चिरीमिरीच्या लालसेपोटी हल्लेखोरांना साथ दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची नि:पक्ष चौकशीसाठी पुन्हा चौकशी होणे गरजेचे आहे. अशातच नवीनच रूजु झालेले ठाणेदार शेळके पुन्हा चौकशी करणार का याकडे लक्ष लागले आहे.


          स्थानिक सि.सि.एन. न्युजचे संचालक तथा अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गवळी हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयात बसले असतांना त्यांच्यावर १०-१५ हल्लेखोरांनी हल्ला चढविला होता. यामध्ये अमोल गवळीसह त्यांचे सहकारी अंकुश खाडे व सागर गावंडे ही गंभीर जखमी झाले होते. पोलीसांनी या प्रकरणामध्ये हल्लेखोरांसोबत सेटींग करून त्यांचे हात ओले झाल्यामुळे उलट अमोल गवळी, नितीन गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याची शहरात जोरदार चर्चा होती. तसेच या हल्ल्यात जवळपास १०-१५ हल्लेखोर असल्याचे तक्रारीत नमुद असुन प्रत्यक्षदर्शींनीही सांगितले आहे. पोलीसांनी मात्र केवळ ३-४ हल्लेखोरांवरच कारवाई केली होती.





 याच प्रकरणात दिरंगाईमुळे ठाणेदार अवचार यांची केवळ २ महिन्यातच चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमधुन हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या जागी आता थेट मुंबईतील भांडुप पोलीस स्टेशनमधुन ब्रम्हदेव शेळके ठाणेदारपदी रूजु झाले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहराचा ठाणेदार शेळके यांना दांडगा   अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची फाईल उघडून पुन्हा चौकशी केल़्यास अनेक सत्य समोर येऊ शकते. व पत्रकाराला न्याय मिळू शकेल. नवीन रुजु झालेल़्या ठाणेदारांकडुन राजकीय व इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता पत्रकार हल्ला प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा अनेकांना आहे.  त्यामुळे ते या अपेक्षांवर खरे उतरतात का हे येणारा काळच सांगेल.




………………………………………………………………………………………………………..


 तर इमानदार अधिकारी अजुनही सेवेत


एका सर्वेनुसार सगळ्यात भ्रष्ट खात्यांमध्ये पोलीस विभाग हा सर्वोच्च स्थानावर असल्याची माहिती मिळाली आहे. दररोज कुठे न् कुठे पोलीस अधिकारी- कर्मचारी लाच घेतांना सापडत आहे. शहरातील पत्रकार हल्ला प्रकरणामध्ये सुध्दा पैशांचा मोठा काळाबाजार झाल्याची चर्चा आहे. जुन्या ठाणेदारांची हकालपट्टी केल्यानंतर नवीन रूजु झालेले ठाणेदार पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करून पोलीस खात्यामध्ये अजुनही इमानदार अधिकारी सेवेत आहे याचे उदाहरण पहावयास मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

via Blogger http://ift.tt/2mXmYuq




from WordPress http://ift.tt/2mQTCw6
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.