वाशीम – मोठेगाव येथील दलित मुलीवरील अत्याचार प्रकरणासह हिंगोली जिल्हयातील मातंग समाजाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हयातील मातंग समाज बाधंवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार, 17 मार्च रोजी आयोजीत एकदिवशीय निषेध धरणे आंदोलनात शेकडो मातंग समाजबांधवांनी सहभाग घेतला.
यावेळी निषेध धरणे आंदोलनादरम्यान जिल्हाधिकार्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, दिवसेंदिवस मातंग, बौध्द समाजाचे महिला पुरूषावरील अत्यांचाराचे प्रकरणात वाढ होत आहे. हिंगोली जिल्हयातील आनंदनगर, बळसोंड येथील मातंग समाजाचे मुलीवर अत्याचार करून तिचा खुन करण्यात आला. या घटनेची शाई सुकते ना सुकते तोच वाशीम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील बौध्द समाजाचे मुलीवर अत्याचार करून तिला जाळुन मारून टाकण्यात आले. अशा अनेक अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत असुन त्या थांबल्या पाहीजे व त्यातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे. हिंगोली जिल्हयातील बळसोंड व डिग्रस येथील मातंग समाजाचे मुलीवर अत्याचार करून खुन करणारे आरोपींना अटक करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे व फाशीची शिक्षा व्हावी. रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील बौध्द समाजाचे मुलीवर अत्याचार करून तिला जाळुन मारून टाकणारे आरोपींना तात्काळ अटक करून प्रकरण जलद गलद गती न्यायालयात चालवावे. तिन्हीही प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून आरोपीस पाठीशी घालणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करून सहआरोपी करण्यात यावे. ऍट्ॅासिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच पाहीजे या मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला असून सदर मागण्यांची पुर्तता न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या आंदोलनामधून देण्यात आला.
धरणे आंदोलनादरम्यान बहूजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष काशीराम उबाळे, अखिल भारतीय मातंग संघाचे विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, सामाजीक कार्यकर्ते विनोद जोगदंड, लहुशक्ती संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास थोरात आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मोचर्र्करुंना मार्गदर्शन करतंाना काशीराम उबाळे म्हणाले की, संतांची भूमि अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय आणि दलित महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येकाने माणसातच देव शोधावा असे रोखठोक विचार मांडणार्या संत तुकाराम महाराज यांच्या महाराष्ट्रात दलित समाजावरील अत्याचाराने परिसिमा ओलांंडली असून खैरलांजी प्रकरणापासुन महाराष्ट्रात दलित मागास प्रवर्गावर अन्यायाची मालीकाच सुरु आहे. याच मालीकेची निच कृती गेल्या एक महिन्याआधी हिंगोली जिल्हयातील बळसोंड या गावात घडली असून या गावात मातंग समाजाच्या मुलीवर त्याच गावातील उच्चवर्णीय जातीच्या लोकांनी सामुहिक अत्याचार करुन तीचा खुन केला तर डिग्रस या गावात मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सवर्णाच्या मुलांनी अत्याचार केला. तसेच वाशीम जिल्हयातील मोठेगाव येथील बौध्द समाजाच्या महिलेवर अत्याचार करुन त्या महिलेला जाळून मारण्यात आले. या सर्व प्रकाराला राज्य शासनाची उदासिनता जातीयवादी धोरण कारणीभुत असल्याचा आरोप उबाळे यांनी करुन दलितांवर अन्याय, अत्याचार प्रकरणात डोळेझाक आणि सवर्ण मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविणे हे भेदभावाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले.
तरी शासनाने सर्वतोपरी समान न्याय देण्याचे कार्य करुन वरील सर्व मागण्यांची विनाविलंब पुर्तता करुन न्याय देण्यात यावा अन्यथ वाशीम जिल्हयात मातंग समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि न्याय न मिळाल्यावर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनामध्ये श्री गणेश मल्टीपर्पज फाऊंडशनचे अध्यक्ष दिनेश आपटे, उपाध्यक्ष रामेश्वर गवळी, मोतीराम धबडघाव, यशवंत हिवराळे, रामेश्वर पाटोळे, माणिक बांगर, चंद्रभान पौळकर, जगदीश मानवतकर, रवीकुमार कांबळे, शेषराव घोडे, ज्ञानेश्वर धबडघाव, भास्कर गायकवाड, लक्ष्मण इंगळे, अंकुश गवळी, विनोद बोरकर, आश्रु थोरात, पुंडलिक झोंबाडे, मंगेश गायकवाड, दिपक अंभोरे, घनशाम करडीले, शालीकराम लगड, संतोष लगड, भानुदास इंगळे, वसंता थोरात, अनिल खडसे, उत्तम लगड, मोहन दुतोंडे, देवानंद गायकवाड, जिजाबाई आडे, संतोष वैरागड, संदीप खडसे, गोपाल झोंबाडे, अनिल खडसे, गजानन भालेराव, प्रविण इंगळे, वामन भालेराव आदींसह जिल्हाभरातून बहूसंख्येने मातंग समाज बांधवांनी सहभाग घेतला होता
via Blogger http://ift.tt/2nzMOTt
from WordPress http://ift.tt/2mXshtQ
via IFTTT
No comments:
Post a Comment