हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने महाराष्ट्रात साजरी करण्यात आली यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अचलपूर शहरात यानिमीत्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले नेहमीप्रमाणे स्थानीक जगदंब देवी येथून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते यांचे सहकार्याने छ.शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा निघून ही मीरवनूक गांधी पूल,देवळी,जूना सराफा,टक्कर चौक अशी मार्गक्रमन करीत झेंडा चौक येथे समाप्त झाली येथे नगराध्यक्षा सुनिता फिसके नगरसेवक नरेंद्र फिसके व जेष्ठ नागरिक यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले तेथे शिवसेना शहर प्रमुख विनय चतुर,सुनिताताई,नरेंद्र फिसके यांनी उपस्थीत शिवभक्तांना संबोधीत केले.शोभायात्रेचे यशस्वीतेकरीता जंगदब व्यायाम शाळेचे अजय,विजय भुजाडे,शिवसेनेचे किशोर कासार, नंदकिशोर काळे,मनोहर कोथळकर,रामदास हागे,प्रमोद भोंडे,माणिक देशपांडे,संजय जयसिंगपूरे,बंडू काटे,हनुमान व्यायाम मंडळाचे विलास बेलसरे,सुधीर चुनारकर व समस्त कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आयोजन समितीचे अध्यक्ष संजयभाऊ तट्टे यांनी यशस्वी नियोजन केले.शोभायात्रेत छ.शिवाजी महाराजांची झांकी,विविध वाद्य व असंख्य चाहत्यांनी सहभाग घेतला.शांतता समिती सदस्य विलास केचे,देवीदास घुलक्षे,किशोर हिरूळकर,निकेश दाभाळे व सर्व गनमान्य नागरीक उपस्थीत होते.सरमसपूरा पोलीस स्टेशनचे थानेदार अभिजित अहिरराव,अचलपुर पोलीस स्टेशनचे नरेंद्र ठाकरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेत मिरवणुक पार पाडली.
via Blogger http://ift.tt/2m4oZX1
from WordPress http://ift.tt/2m4kRWV
via IFTTT
No comments:
Post a Comment