–
सेनगांव :- येथील नगरपंचायतचे शैलेश फडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत धडक वसुली माेहीम पथकाने मालमत्ता कर वसुली थकबाकी असणार्या बसस्थानक कार्यालयास व माेबाईल कंपनीच्या दाेन टावर कार्यालयाला आज दि. 17 मार्च शुक्रवारला शिल ठाेकले.
मार्च एडींग असल्याने सेनगांव नगरपंचायत कडुन धडक वसुली माेहीम चालु असुन कायदे बाबीची पुर्तता करुनच नगरपंचायतने आज सेनगांव बसस्थानक कार्यालयाची स्थापना ही 1996 ला युतीच्या काळात झाली असुन तेव्हा पासुन बसस्थानक कार्यालयाने 2 लाख 11 हजार 720 एवढा कर न भरल्याने व वेळाेवेळी नाेटीसा देऊन ही थकबाकी न भरल्याने आज बसस्थानक कार्यालयास सिल ठाेकले यानंतर रिलायंस माेबाईल टावर कार्यालयाकडे ही 88 हजार रुपये थकबाकी तर वाेडाफाेन माेबाईल टावर कार्यालयाकडे 88 हजार रुपये थकबाकी असल्याने या दाेन्हीही माेबाईल कंपनीच्या टावरला सिल ठाेकले यामुळे सेनगांव शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालयाकडे थकबाकी असणार्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी मुख्याधिकारी शैलेश फडसे जातीने हजर हाेते. यावेळी मुख्याधिकारी फडसे यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक डि.ए.गव्हाणकर, कर निरीक्षक पि.यु.पांडे, कार्यालयीन अधिक्षक ए.बी.कपाटे सह प्रल्हादराव गाढवे,विशाल जारे,परसराम काेकाटे,कैलास बिडकर,शे.फकीर मामु,जगन्नाथ दिनकर,केशव वाघ,विनायक गाडे,नामदेव हरण आदी कर्मचारी उपस्थित हाेते.
via Blogger http://ift.tt/2maPCt8
from WordPress http://ift.tt/2nNfgAO
via IFTTT
You can give or publish your Ads in Dinakaran through Eumaxindia. We offer special discount on tariff rates. Dinakaran is a Tamil daily newspaper distributed in Chennai.
ReplyDeleteAds in Dinakaran