Latest News

शहरात ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात शिवजयंती साजरी

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्व सामान्यांचा राजा,क्षत्रीय कुलपंतस सर्व धर्मसमभाव जपणारा राजा, गो ब्राम्हण प्रतिपालक आदर्श राजा शिव छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्त्याने शहरात
त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमाची शोभायात्रा काढण्यात आली. 


       शहरातील शिवाजी नगरातुन बुधवारी सायंकाळी ७ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात येताच अनेकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले.



 या शोभायात्रेत ढोल- ताशे, डि.जे. सोबत घोड्यावर शिवाजी महाराजांच्या भुमिकेत, मावळे, रथावर जिजामाता पालखी, झांसीची राणीच्या भुमिकेत यांसह ऐतिहासिक देखावे होते. यावेळी शिवसैनिकांसह शहरवासी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

via Blogger http://ift.tt/2mwpl3Y




from WordPress http://ift.tt/2mNufvf
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.