महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय मोप येथील कु.अश्विनी ओम गिरी व कु.पुजा गजानन आघाव यांनी घवघवीत यश संपादन केले त्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम व होळकर शाहीचे संस्थापक श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची ३२४ वी जयंती शाळेत साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोपीकिसन सिकची तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डि.एन.अघडते सर होते.विचारमंचावर पर्यवेक्षक एस.एस.नरवाडे,प्रा.ए.एम.सोनुने,जेष्ठ शिक्षक आर.एस.तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरानी मिळविलेल्या यशाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यव्रुती योजना परिक्षा २०१६-२०१७ मध्ये वर्ग ८ वी साठी २० नोंव्हेबर रोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेत महाराष्ट्रात एकुण ९०९२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यामध्ये ११४७३ विद्यार्थी शिष्यव्रुत्ती धारक म्हणुन पात्र ठरले तर वाशीम जिल्ह्यातुन ९४० विद्यार्थ्यींनी परीक्षा देऊन १७६ विद्यार्थी शिष्यव्रुत्तीसाठी पात्र ठरले.विशेष बाब म्हणजे श्री.शिवाजी विद्यालय मोप येथील ग्रामीण भागातील कु.अश्विनी ओम गिरी ही भ.ज.ब.प्रवर्गातुन जिल्ह्यात प्रथम तर कु.पुजा गजानन आघाव ही भ.ज.ड प्रवर्गातुन तिसरी आली आहे.यांना दरमहा ५०० रु शिष्यव्रुत्ती मिळणार आहे.या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या यशामुळे पुन्हा शाळेचे नांव चर्चेत असुन याचा फायदा पुढील वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढण्यात नक्कीच होईल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.कारण आज पालक वर्ग सुध्दा सुज्ञ आहे. गुणगौरव कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन व आभार श्री.निलेश पुंड सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक व सिकवाल बाबुजी,केचकर बाबुजी,गजानन पुरी,कैलास शर्मा,सचिन गणवीर,केशव मुळे,भागवत नरवाडे,बाळासाहेब देशमुख,गजानन मोरे यांनी परिश्रम घेतले.
via Blogger http://ift.tt/2nzXH7Y
from WordPress http://ift.tt/2nNuNk4
via IFTTT
No comments:
Post a Comment