रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओट्यावर सध्या फक्त व्यापाऱ्याच्या मालाचे पोते साठविलेले आहेत व शेतकऱ्यांनी आणलेला माल मात्र खाली इतरत्र ठेवावा लागतो हि अतिशय गंभीर बाब असून शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक हेळसांड करणारी आहे.व्यापाऱयाचें पोते तात्काळ उचलून शेतकाऱ्यांकरिता जागा ताबडतोब रिकामी करा अन्यथा सर्व पोते शेतकऱ्यांचे समजून हारास करण्यात येतील असी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले व सर्व शेतकरी यांनी बाजार समितीच्या सचिवांना निवेदनाद्वारे कळविले आहे.आज पर्यंत वाशिम जिल्ह्यात भारतीय खाद्य निगम ची सर्वात जास्त खरेदी हि रिसोड ला झाली असून सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करण चालू आहे असे सभापती पाचरणे यांनी सांगितले आहे, बाजार समितीचा नियम असा आहे की व्यापारानी घेतलेला माल हा घेतल्यानंतर हा बाहेर न्यावा लागतो परंतु मार्केट कमिटीच्या आशीर्वादाने तो माल तिथेच ठेऊन शेतकऱ्याचा मला हा रस्त्यावर टाकल्या जात आहे.याकडे लक्ष देण्यात यावे आणि तो मला त्वरित काढण्यात याव्या अन्यथा आम्ही ताबा करू असे शेतकऱ्यांनी सांगितले
via Blogger http://ift.tt/2mG2Z0B
from WordPress http://ift.tt/2mG44Wm
via IFTTT
No comments:
Post a Comment