Latest News

आय.टी.आय.मध्ये ‘अवेरनेस प्रोग्राम फॉर वुमेन्स राईट ‘वर कार्यशाळा



चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचे औचित्य साधून स्थानिक आ.टी.आय.येथे ‘अवेरनेस प्रोग्राम
फॉर वुमेन्स राईट ‘ची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.एस. पाटबागे व प्रमुख अतिथी म्हणून चांदूर रेल्वे
पो.स्टे.च्या एपीआय आगासे मॅडम तर मानवधिकार मिशनचे संस्थापक  वाघमारे
उपाध्यक्ष हरिभाऊ चवरे, सचिव खुशाल खडसे,काऊंसलर प्रदिप बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी काऊंसलर प्रदिप बनसोड यांनी विद्याथ्र्यांचे ब्रेन वॉश करून संपूर्ण विद्याथ्र्यांना मंत्रमुग्ध केले.
महिलांचे सामाजिक, धार्मिक आणि राजकिय संस्था कडून कसे शोषण होते व यापासून विद्यार्थीनीने व
महिलांनी कशा प्रकारे सतर्कराहून  परिभ्रमण करावा याबद्दल व कायद्याबद्दल धीरज
वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. एपीआय आगासे मॅडम सोशल मीडियावर होणारी चॅटींग व त्यापासून
होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली.प्रकाश रंगारी यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
संचालन एनएनएस कार्यक्रम अधिकारी जि.एच.फेरत  व आभार सि.एच.चांदूरकर यांनी मानले.या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक टांगले, नवरंगे, चौधरी, वसुले, सिसोदे, मर्दाने, रामु कनोजे,
रंगारी मॅडम, पुंड, रामटेके मॅडम, वाघमारे व मानवाधिकार मिशनचे रविना कुमरे, विमल भदे, सविता
धारणे, इंद्रकला नारनवरे, उत्तम पाटील, रमा धोटे, विजय बन्नोरे, विजय पारवे, रवींद्र गजभिये,
छायाचित्रकार विनोद डोंगरे, विजय सरदार यांनी परिश्रम घेतले.

via Blogger http://ift.tt/2nvZJWF




from WordPress http://ift.tt/2myvGwx
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.