Latest News

आरटीओ कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

यवतमाळ: –



गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरीकांना त्याचा ताबा मिळावा, यासाठी मार्च महिन्यातील सर्व सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय सुरू राहणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनाची खरेदी होणार असल्याने त्या अनुषंगाने महसूल वसुली, उद्दिष्ट पुर्तता करणे यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दि. 19, 25, 26 आणि 28 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. या दिवशी वाहन नोंदणी, तसेच कर वसुलीचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी आवश्यक असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

via Blogger http://ift.tt/2nNmRiH




from WordPress http://ift.tt/2mXvZne
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.