Latest News

बंगालमध्ये सरस्वती पूजनाची अनुमती मागणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार

कोलकाता – 
बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील तेहत्ता येथील सरकारी विद्यालयात गेल्या ६५ वर्षांपासून वसंतपंचमीला सरस्वती पूजन साजरे करण्याची परंपरा आहे; परंतु यावर्षी शाळा व्यवस्थापनाने स्थानिक धर्मांधांच्या दबावाखाली येऊन सरस्वती पूजनाची अनुमती नाकारली. त्यामुळे हिंदु विद्यार्थी आणि स्थानिक गावकरी यांनी शाळेच्या जवळ असलेला राष्ट्रीय महामार्ग ६ रोखून धरला. त्यामुळे मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला. यात विद्यार्थी-विद्यार्थिनी गंभीर घायाळ झाले आहेत.
प्राप्त वृत्तानुसार २ मासांपूर्वी तेहत्ता माध्यमिक शाळेच्या परिसरात बलपूर्वक घुसून येथील काही धर्मांधांनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना मारहाण करून शाळेच्या इमारतीवर बलपूर्वक हिरवा झेंडा फडकवला होता. परिसरातील तणावपूर्ण वातावरणामुळे शाळा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी धर्मांध गटाची बैठक पार पडली. या बैठकीत नबी दिन (महंमद पैगंबर दिन) साजरा करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर शाळेच्या इमारतीवरील हिरवा झेंडा काढण्यात आला. त्यानंतर शाळेतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या काही विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरात शाळा व्यवस्थापनाच्या अनुमतीशिवाय बळजोरीने
१३ डिसेंबर या दिवशी ‘नबी दिवस’ (महंमद पैगंबर दिन) साजरा केला होता. तेव्हापासून परिसरात पसरलेल्या तणावामुळे शिक्षण मंडळाने ही शाळा बेमुदत बंद ठेवली आहे. मानसिक तणावामुळे मुख्याध्यापक उत्पल मलिक यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. हावडा हे क्षेत्र उलुबेरिया येथून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार सुलतान अहमद आणि पूर्व उलुबेरियाचे आमदार हैदर अजीज यांचे कार्यक्षेत्र आहे.

via Blogger http://ift.tt/2k1GqCt




from WordPress http://ift.tt/2kynluy
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.