Latest News

‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी ‘दैनिक जागरण डॉट कॉम’च्या संपादकाला अटक

नवी दिल्ली – 

उत्तरप्रदेशमध्ये सर्व जागांवरील मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने ‘एक्झिट पोल’ (मतदानपूर्व चाचणी) आणि जनमत चाचण्या यांवर निर्बंध घातले असतांना दैनिक जागरण समूहाने ‘एक्झिट पोल’ प्रकाशित केले. याप्रकरणी ‘http://www.jagran.com/’चे संपादक शेखर त्रिपाठी यांना १३ फेब्रुवारीच्या रात्री अटक करण्यात आली. ‘पहिल्या टप्प्यात उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असेल’, असे भाकीत या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तवण्यात आले होते. ‘दैनिक जागरण’ समूहाने लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केले असून या प्रकरणात २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड, अशी शिक्षा आहे. अशा प्रकारे चाचण्या घेणे आणि त्यांचे निष्कर्ष वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे, हा गुन्हा आहे’, असे आयोगाने म्हटले आहे.

via Blogger http://ift.tt/2ljSsL7




from WordPress http://ift.tt/2lRhsab
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.