Latest News

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान पथक रवाना


*55 गट, 110 गणांसाठी आज मतदान
*जिप, पंस साठी 928 उमेदवार रिंगणात
*मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती


यवतमाळ-
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यात पहिल्या टप्प्यात 55 गट आणि 110 गणासाठी शुक्रवारी, दि. 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी आज मतदान पथक संबंधित गावी रवाना झाले आहे. यावर्षी प्रथमच उमेदवारांनी शपथपत्रात नमूद केलेल्या माहितीतून उमेदवारांची संपत्ती आणि दाखल गुन्ह्यांची माहिती फलकाद्वारे लावण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सोळा पंचायत समितीसाठी यात मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 55 गटात 319 उमेदवार आहेत, तर पंचायत समितीसाठी 609 असे एकूण 928 उमेदवार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या क्षेत्रासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. दिव्यांग आणि वृद्धांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानोत्तर आणि जनमत चाचणीवरही निर्बंध घालण्यात आले आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत याचे निकाल जाहिर करता येणार नाही.
यावेळी निवडणूक आयोगाने नव्याने काही नियम लागू केले आहे. यात उमेदवारांची माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. यात संपत्तीच्या माहितीसोबतच संबंधित उमेदवारांवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहे, याचीही माहिती फलकाद्वारे देण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक संपल्यापासून 30 दिवसांच्या आत तर पक्षांना 60 दिवसांच्या आत निवडणूक खर्च यंत्रणेस कळवावा लागणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

via Blogger http://ift.tt/2lKVqsF




from WordPress http://ift.tt/2kSHV8H
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.