औरंगाबाद – आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाला झुलवत ठेवणा-या भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. लाखोंचे मोर्चे काढूनही सरकारनं आरक्षणाच्या मुद्याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट भाजप सरकारनं मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रतत्न केला आहे. त्यामुळे उद्या होणा-या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करु नका असा ठराव औरंगाबादमध्ये आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकारचा अनेक पोस्ट सध्या फेसबुक च्या माध्यमातून शेयर केल्या जात आहेत
via Blogger http://ift.tt/2lR8WXS
from WordPress http://ift.tt/2ky655a
via IFTTT
No comments:
Post a Comment